मी सह्याद्रीचा… सह्याद्री माझा!” by Dilip Usha Ingale

१९९८ पासून सह्याद्रीत भटकंती करत आलोय. कितीही अनुभव असला तरी प्रत्येक भटकंती हा माझ्यासाठी नवा दिवस असतो — नवा घाट, नवी वाट, नवं वातावरण. सह्याद्री एक गोष्ट सतत शिकवतो — “चुकीला माफी नाही.”

 

आजकालची पिढी सहा तासांची भटकंती दहा मिनिटांच्या यूट्यूब व्हिडिओत किंवा एका ब्लॉगमध्ये एडीट करून टाकते. पण या दहा मिनिटांत फक्त आकर्षक ड्रोन फुटेज दाखवून ती भटकंती किती सुंदर झाली हे दाखवलं जातं — मात्र त्या यशामागचा अनुभव, डोंगरमाथ्याचं ज्ञान, बदलणारं वातावरण, अनवट घाटवाटा आणि भटकंतीदरम्यान घ्यावी लागणारी जबाबदारी — या सगळ्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलं जातं.

पावसाळ्यात कोणती वाट धोकादायक ठरू शकते, कोणत्या टेकडीवर जायचं नाही, कोणत्या शूजचा वापर करायचा — या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच खरंतर आपला जीव वाचवतात. तुम्हाला सांगू.. तर, सह्याद्री ह्या काही फक्त पर्वतरांगा नाहीत बरं.. आयुष्य समृद्ध करायला शिकवणारं विद्यापीठ आहे माझा सह्याद्री. आणि हे विद्यापीठ पर्वतराजींची मुशाफिरी करत असताना आपल्याला शिकवतात अवधान, संयम आणि जबाबदारी… 

वरवर दिसणारा निसर्ग कितीही भूरळ पाडणारा दिसला.. सुंदर दिसला तरी तो बेपर्वाईला कधीच माफ करत नाही.

लक्षात आहे ना.. सह्याद्रीत.. चूकीला माफी नाहीच… 

 

सह्याद्री शिकवतो – पाऊल टाकताना विचार कर!”

मला उनाड भ्रमंती आणि CTR Shoes यांच्या अधिकृत सहकार्याने एक संधी मिळाली – सह्याद्रीतील सुरक्षित भटकंतीविषयी बोलण्याची. कारण गेल्या काही वर्षांत दिसतंय, अपघातांची मोठी कारणं म्हणजे योग्य फुटवेअर्सच्या निवडीचा अभाव. आजची पिढी ट्रेकसाठी जाताना अजूनही crocks किंवा साध्या सॅंडल्स वापरते. काहींना वाटतं पाणी लगेच निघून जातं म्हणून त्या योग्य आहेत. पण सह्याद्रीचा पावसाळा म्हणजे चिकुट, निसरडी वाट, आणि घसरून पडण्याचा धोका! रिजवर चालताना एक चुकीचं पाऊल जीवघेणं ठरू शकतं.

एक चांगल्या क्वालिटीचे trekking shoe म्हणजे अर्धं यश!

ते comfortable असायला हवं, flexible, fatigue-less, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम grip आणि ankle protection असलेलं. असं शूज असेल तर समजा तुम्ही भटकंतीचा अर्धा प्रवास आधीच जिंकलात. त्यासोबत थोडं fitness, थोडं awareness — इतकं पुरेसं आहे सह्याद्रीशी मैत्री टिकवायला.

पुण्यातील उनाड भ्रमंती गेली तीन वर्षं CTR Shoes सोबत भटक्यांची काळजी घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे शूजबद्दल चर्चाही मिडियावर झळकली. काही लोक अजूनही “आम्ही सॅंडलवर चालतो”, “आम्हाला क्रॉक सोयीचे वाटतात” असं म्हणतात — पण सेफ्टीच्या दृष्टीने ते योग्य नाही.

नेहमी ankle shoes वापरावे — त्यामुळे पाय twist होण्याचा धोका कमी, आणि गवतातून चालताना सापाचाही धोका टळतो.

 रेंज ट्रेकदरम्यान थोड्या वेळासाठी थांबून शूज काढून पायाला गारवा द्या — त्या क्षणाचं समाधान काही औरच असतं! 😌

 तसंच, नेहमी एक spare pair of socks सोबत ठेवा — त्यामुळे heat-ball होण्याची शक्यता कमी होते.

सह्याद्रीवर भटकणं म्हणजे फक्त डोंगर चढणं नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधणं आहे.

आणि त्या संवादासाठी सुरक्षित पायरी हीच — योग्य शूज, योग्य तयारी आणि योग्य दृष्टिकोन.

 

काहींच्या मते CTR Shoes थोडे heavy weight आहेत — त्यामुळे cramp येतो, भटकंतीदरम्यान त्रास होतो, म्हणून light weight shoes पाहिजेत असं म्हणतात. खरं सांगायचं तर दोन्ही प्रकार शुभ आणि उपलब्ध आहेत. पण माझ्या मते, भटकंतीसाठी heavy shoes वापरलेले चांगले.

कारण आपण वजनदार शूज वापरतो तेव्हा आपले calf muscles, endurance, आणि strength नैसर्गिकरित्या वाढतात.

म्हणूनच भटकंतीला जाण्याच्या दोन आठवडे आधी सराव केला पाहिजे. पायांची तयारी हवी, नखं कापून घेतली पाहिजेत — कारण भटकंती म्हणजे फक्त चालणं नाही, ती शरीराची आणि मनाची तयारी आहे.

आपल्याला double lace बांधता आली पाहिजे, जेणेकरून ट्रेकदरम्यान लेस वारंवार सुटणार नाहीत. एकदा विचार करा — तुम्ही घाटमाथ्यावरून खाली उतरलात, तुमच्या पायात योग्य, मजबूत शूज आहेत, आणि पठार लागलं… अशा वेळी तुम्हाला तुमचा वेळ पुन्हा recover करता येतो.

भटकंती नेहमी लवकर सुरु करावी, आणि संध्याकाळी पाचच्या आत दुसऱ्या गावात पोहोचणं आवश्यक आहे. कारण रानात संध्याकाळ पटकन उतरते — आणि अंधारात भटक्यांची खरी भीती सुरू होते. 

शूज म्हणजे फक्त सुरक्षा नाही — Shoes म्हणजे तुमचं हृदय आहे. भटकंती म्हणजे स्पर्धा नाही, ती एक शिस्त आहे. काही experts म्हणतात, शूज महत्त्वाचे आहेतच, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ascent आणि descent करताना पावलं कुठे आणि कशी ठेवता. ते शिकलात, की अर्धा धोका संपतो.

तुमच्याकडे नेहमी reserve water असायला हवं. त्यासाठी hydration pack हे सर्वोत्तम आहे. कारण sack मधून वारंवार बाटली काढून ठेवणं वेळखाऊ ठरतं, आणि चढणीत तो वेळ मौल्यवान असतो. Hydration pack वापरल्यामुळे वेळ वाचतो, शरीराचं dehydration टाळलं जातं, आणि नियमित sip-sip घेत राहिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

“मी सह्याद्रीचा… सह्याद्री माझा!”

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे body excursion. उन्हाळ्यात भटकंती करताना आपण खूप पाणी पितो — पण त्याच वेळी heat stroke होण्याचीही शक्यता वाढते. म्हणून पाणी प्रमाणात घ्या, नियमित घोट घेत रहा, पण ओव्हरहायड्रेशन टाळा. आजची पिढी बहुतांश वेळा फक्त पावसाळ्यात भटकंती करताना दिसते. पण भटकंती म्हणजे फक्त हिरवाई आणि धबधबे पाहणं नाही.

अनेकदा लोक विचारतात — “तुम्ही पैसे देऊन भटकंतीला जाता, तंगडतोड करता… त्यातून नेमकं मिळतं तरी काय?”

माझं उत्तर साधं आहे — भटकंती म्हणजे आत्मानुभव.

तुम्ही फक्त निसर्गाचा आनंद घेऊ नका, तर सह्याद्रीला जाणून घ्या. तीनही ऋतूत भटकंती करा — कारण प्रत्येक ऋतू सह्याद्रीचं नवं रूप दाखवतो, नवा अनुभव देतो.

सह्याद्री अभ्यासा — गडकिल्ले, घाटवाटा, लेण्या, निसर्गाची जैवविविधता, soil conservation, स्थानिक नाळा, भौगोलिक रचना, इतिहास, आणि समाजजीवन यांचा सखोल अभ्यास करा. या सर्वातून तुमचं योगदान उभं राहतं — सामाजिक जाणीवा वाढतात.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लेकरांना शैक्षणिक साहित्याची, मदतीची नेहमी गरज असते. जर तुमचं पाऊल त्या दिशेनं पडलं, तर समजा तुमची खरी “नाळ सह्याद्रीशी जोडली गेली.”

शेवटी, मला ही लेखनाची संधी दिल्याबद्दल

उनाड भ्रमंती CTR Exclusive Store, Authorised Tripole Seller — किर्ती मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

“मी सह्याद्रीचा… सह्याद्री माझा!”

2 thoughts on “मी सह्याद्रीचा… सह्याद्री माझा!” by Dilip Usha Ingale

  1. Vijay B

    खुप सुंदर वर्णन व सह्याद्री मधे सुरक्षित भटकंती करण्यासाठी योग्य ती माहिती आपण दिलीत.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *